पोलीस प्रशासन विरुद्ध ध्वनी प्रदूषण लढतीत जनमताचा दारूण पराभव

फलटणकर जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवणाऱ्यांवर पोलिसांनी एक दोन दिवस अगोदर पत्रकार परिषद घेऊन कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी दिलेला इशारा आणि प्रत्यक्षात डीजे वाजल्यानंतर त्यावर झालेली शून्य कारवाई यात महाप्रचंड तफावत असल्याचे फलटण तालुक्यातील जनतेच्या निदर्शनास आले. फलटण तालुक्यातील जनतेच्या त्या संदर्भात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मिरवणुकींमध्ये डीजेवर बंदी घालण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले होते. डीजे बंदीचा उद्देश ध्वनी प्रदूषण कमी करणे आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हा होता.

जेव्हा पोलिस प्रशासन पत्रकार परिषदेत डिजे बंदी विषयी मोठी मोठी आश्वासनाने देतात, पण त्यांची कर्तव्य बेरीज शून्य पद्धतीने पार पाडतात. तेव्हा हे वास्तव लोकशाहीच्या दृष्टीने जनतेसाठी प्रचंड निराशाजनक आहे आणि त्यामुळे अशावेळी जनतेची विश्वासार्हता कमी होत आहे. याची गंभीर दखल सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

कायद्याची व कर्तव्याची अंमलबजावणी केली नाही तरी अधिकारी वर्गास त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरले जात नाही, ज्यामुळे या अधिकारी वर्गामध्ये दंडमुक्तीची संस्कृती कायम राहून लोकशाहीचे व जनतेचे आणखी नुकसान होत आहे.

खरं तर, कायदा व कर्तव्याची अंमलबजावणी करुन प्रशासकीय अधिकारी वर्गा विषयी जनतेच्या मनात आदर आणि विश्वासार्हता वाढीस लागून संबंधित प्रशासन आपला प्रभाव कायम ठेवण्यात यशस्वी होणे आवश्यक आहे.

फलटण तालुक्यातील जबाबदार लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतींसाठी आणि त्यांच्या संघांच्या कामगिरीसाठी जबाबदार धरल्यास सामाजिक व सार्वजनिक स्तरामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होऊ शकते. पण फलटण तालुक्यातील जबाबदार लोकप्रतिनिधी आपले कर्तव्य पार पाडत आहेत का ? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे.

  • Related Posts

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    पालकमंत्री संतापले; शिवसैनिक व जनता योग्य उत्तर देईल

    पालकमंत्री संतापले; शिवसैनिक व जनता योग्य उत्तर देईल

    प्रजा गटाच्या प्रयत्नातून डिपी तात्काळ सुरू; शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त

    प्रजा गटाच्या प्रयत्नातून डिपी तात्काळ सुरू; शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त

    शेतकऱ्यांची प्रजा गट जनसंपर्क कार्यालयास भेट

    शेतकऱ्यांची प्रजा गट जनसंपर्क कार्यालयास भेट

    उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

    उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा
    error: Content is protected !!