फलटण तालुक्यातील नांदल गावातील धनाजी संभाजी गुळदगड यांचा डीपी सहा वर्षात चार वेळा जोडुनदेखील सहा वर्षे सदर ठिकाणचा डिपी बंद अवस्थेत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मागील आठवड्यात प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन केली होती. सदर तक्रारीनंतर प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणचे अधिकारी ग्रामोपाध्ये, आसापुरे व आडम यांचेशी संपर्क साधला व वीज महावितरणकडून झालेल्या प्रचंड दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती देऊन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली होती.
त्याप्रमाणे प्रजा गटाच्या माध्यमातून प्रजा गटाचे प्रमुख प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन तातडीने नांदल गावातील डिपी तात्काळ बसवण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फलटण तालुका प्रजा गट व वीज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.







