मंजूर ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामात प्रचंड दिरंगाईमुळे झिरपवाडीत पाण्याची समस्या

फलटण : यावर्षी फलटण तालुक्यात व झिरपवाडी गावात पाऊस काळ चांगला राहिलेला आहे. परंतु शासकीय कामे सुरू असल्यामुळे झिरपवाडी ग्रामपंचायतीला गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. एकीकडे फलटण शहरातील कॅनॉलचे अस्तरीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे अजून काही कालावधीसाठी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही. तर दुसरीकडे फलटण-दहिवडी रस्त्याचे काम सुरू असून त्यामध्ये पाईपलाईन वारंवार तुटत असल्याकारणाने ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीला अडचणी निर्माण होत आहेत. अशा प्रकारच्या चर्चा ग्रामस्थांमध्ये व्हाट्सअप सोशल मीडियावर सातत्याने सुरू असुन सर्वांनी पाणी काटकसरीने वापरावे अशा सूचना देखील ग्रुप वर दिसत आहेत. तसेच पाझरतलावातील विहीरचे पाणी सोडण्याचे नियोजन करा अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत असल्याचे झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या रेखाताई नवनाथ गुंजवटे यांनी सांगितले

झिरपवाडीत पाझर तलावाच्या ठिकाणी ग्रामपंचायतीची विहीर व पाईपलाईन उपलब्ध असून, मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी अंदाजे तीन महिन्यांपुर्वी अतिरिक्त ट्रान्सफाॅर्मर देखील मंजूर झालेला आहे. परंतु सदर ठिकाणचे ट्रान्सफाॅर्मर बसवण्याचे काम हे अत्यंत कासवगतीने सुरू असून त्यामुळे झिरपवाडी गावातील ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती झिरपवाडी ग्रामपंचायत सदस्या रेखा गुंजवटे यांनी दिली.

प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांना सदर बातमी समजताच त्यांनी तातडीने फलटण वीज महावितरणचे मुख्य अभियंता ग्रामोपाध्ये यांना झिरपवाडी पाझरतलाव येथील ट्रान्सफाॅर्मर तात्काळ बसवून झिरपवाडी गावातील ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सूचना केलेल्या आहेत. तसेच ट्रान्सफाॅर्मर सुरू होईपर्यंत सातत्याने आपण पाठपुरावा करणार असल्याचे प्रदीप झणझणे यांनी सांगितले.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!