निवडणूकी अगोदर व निवडणुकी नंतरही “फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर व उपलब्ध”

फलटण : फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (हिंगणगाव) येथील पोल्ट्री डिपी (१०० केव्हीए) जळाला असल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी १४ मार्च २०२६ रोजी प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांना दिली होती. सदर डीपी वीज महावितरण कडून तात्काळ बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन केली होती. सदर मागणीनंतर प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणचे अधिकारी ग्रामोपाध्ये, मोकाशी, रेड्डी, आडम व माने यांचेशी संपर्क साधुन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली होती.

त्याप्रमाणे प्रजा गटाच्या माध्यमातून व प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शेरेचीवाडी (हिंगणगाव) येथील शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन दोन दिवसात १६ मार्च २०२६ रोजी सदर डिपी तात्काळ बसवण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फलटण तालुका प्रजा गट व वीज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रजा गटाच्या माध्यमातून होत असलेल्या निस्वार्थ कार्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. तसेच निवडणुकी अगोदर व निवडणूकी नंतरही फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर असल्याचे पहायला मिळत आहे.

  • Related Posts

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    संपादक : प्रदीप झणझणे

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    प्रदीप झणझणे, प्रजा गट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत
    error: Content is protected !!