सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका उपाध्यक्ष निवृत्ती अशोक खताळ यांनी आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करत नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. हा पक्षप्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीचे लातूर महानगरपालिका गटनेते अमोल लांडगे, सातारा जिल्हा निरीक्षक अभय बनसोडे आणि जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना निवृत्ती खताळ यांनी आगामी फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे सांगितले. तसेच वंचित बहुजन आघाडीची विचारधारा तालुक्यातील प्रत्येक गावातील घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील गावोगावी पोहोचवून सर्व वंचित घटकांना एकत्र आणण्याचे काम केले जाईल. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान मिळवून देत आगामी काळातील सर्व निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये सरचिटणीस सुनील कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, अरुण गायकवाड, जीवन धोंडगे, अमोल गायकवाड, योगेश वांजळे, प्रकाश गायकवाड, सुरेश कांबळे, स्वप्नील बनसोडे, जगन्नाथ वाघमारे, नितीन भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

निवृत्ती खताळ यांच्या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर स्वतः खताळ यांनीही पक्षाच्या ध्येयधोरणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवत तालुक्यात वंचित बहुजन आघाडी अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी जाहीर केला.

  • Related Posts

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    शेतकऱ्यांच्या हाकेला धावला प्रजा गट; प्रदीप झणझणे यांचं दमदार कार्य

    शेतकऱ्यांच्या हाकेला धावला प्रजा गट; प्रदीप झणझणे यांचं दमदार कार्य
    error: Content is protected !!