“श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

प्रदीप झणझणे यांचा कामगारांच्या मागणीला जाहीर पाठिंबा

फलटण : कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रजा गट त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच शासनाने संवेदनशील भूमिका घेत कारखान्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणीही प्रजा गटाच्या वतीने करण्यात आली.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, त्याची सर्वाधिक झळ मात्र सामान्य कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एका बाजूला आरोप-प्रत्यारोप, बैठका आणि राजकीय भूमिका यांची चर्चा रंगत असताना, दुसऱ्या बाजूला रोजच्या मजुरीवर संसार चालवणाऱ्या सहाशे ते सातशे कामगारांच्या घरातील चूल पेटवण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी सांगितले.

कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांचे नियमित उत्पन्न थांबले असून, घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. काही कुटुंबांवर तर आर्थिक संकट इतके गडद झाले आहे की उद्याचा दिवस कसा जाईल, याचीही चिंता त्यांना सतावत असल्याचे प्रजा गटाच्या वतीने कामगारांच्या भावना प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केल्या.

कारखाना हा केवळ उद्योग नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ राजकीय दृष्टीकोनातून न पाहता मानवी संवेदनांच्या दृष्टीने पाहण्याची गरज फलटणकर जनतेतून व्यक्त होत आहे. कारखान्यावरील स्थगिती लवकर उठवून तो पुन्हा सुरू झाल्यास शेकडो कामगारांच्या घरातील चूल पुन्हा पेटू शकेल आणि स्थानिक अर्थचक्रालाही नवसंजीवनी मिळू शकेल, अशी अपेक्षा कामगार आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती प्रदीप झणझणे यांनी दिली.

आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यापैकी कोण पुढाकार घेऊन श्रीराम कारखाना आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लावणार आहे की नाही, याची उत्सुकता फलटणकर जनतेमध्ये वाढली आहे.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!