“दे टाळी मला, घे टाळी तुला”

फलटण तालुक्यातील नेत्यांनी गाजवला अमृत महोत्सवी सोहळा ; जनता आता कशी दाद देणार याकडे लक्ष

ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि त्यांच्या पत्नी सौ. इंदूमती मेहता यांचा अमृत महोत्सवी नागरी सत्कार सोहळा आज फलटण शहरातील महाराजा मंगल कार्यालय येथे दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एरव्ही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळख असलेले, भाषणांमधून व पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर कायम तोंडसुख घेणारे, असे सर्व प्रमुख राजकीय नेते एकमेकांशी कधी हास्य, विनोद, संवाद, गप्पागोष्टी, एकमेकांना टाळ्या देणे, चेष्टा, मस्करी करताना एकत्रित पाहायला मिळतील असे फलटणकरांना कधीही स्वप्नातही वाटले नसावे. पण फलटण तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी त्यांच्या लेखणीच्या कार्य कर्तुत्वाने पत्रकारितेमध्ये अनेक किमया केलेल्या आहेत, तशाप्रकारे त्यांनी आपल्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची किमया देखील करून दाखवली.

राजकारणात कोणताही आकस, राग, द्वेष भावना मनात न ठेवता, कायम एकमेकांशी सुसंवाद होणे हे खूप महत्त्वाचे आहे. विरोध हा वैचारिक असावा व तो जनतेच्या विकासासाठीचा असावा, अशा प्रकारचे दर्जेदार राजकारण होणे हे लोकशाही बळकट होण्यासाठी अपेक्षित असते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या सर्व नेत्यांची राजकीय प्रगल्भता पाहून आता जनतेच्या मनात प्रश्न आहे की, फलटण तालुक्याच्या विकासाबाबत ही सर्व नेते मंडळी अशीच कायम एकत्रित येतील का ? काही असो पण फलटण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असे चांगले क्षण, असे चांगले दिवस, कायम फलटण तालुक्याला अनुभवायला मिळावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • Related Posts

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    पालकमंत्री संतापले; शिवसैनिक व जनता योग्य उत्तर देईल

    पालकमंत्री संतापले; शिवसैनिक व जनता योग्य उत्तर देईल

    प्रजा गटाच्या प्रयत्नातून डिपी तात्काळ सुरू; शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त

    प्रजा गटाच्या प्रयत्नातून डिपी तात्काळ सुरू; शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त

    शेतकऱ्यांची प्रजा गट जनसंपर्क कार्यालयास भेट

    शेतकऱ्यांची प्रजा गट जनसंपर्क कार्यालयास भेट

    उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

    उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा
    error: Content is protected !!