उच्चांकी ऊसदर मिळण्यासाठी राजू शेट्टींच्या शेतकरी सभेला उपस्थित रहा – प्रजा गट

फलटण : निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये गर्दी करण्यापेक्षा शेतकरी फलटणकरांनी उच्चांकी ऊस दर मिळवण्यासाठी शेतकरी नेत्यांच्या सभेला उपस्थित का राहू नये, शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी साखरवाडी मध्ये शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस दर मिळावा याकरिता शेतकऱ्यांसाठी जाहीर सभा घेत आहेत. त्या ठिकाणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजू शेट्टी यांचे बळ वाढवणे हे शेतकऱ्यांसाठी आवश्यक नाही का. कोणीही नेता असो, कोणत्याही पक्षाचा वा गटाचा असो, जो फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, येथील जनतेच्या हितासाठी आवाज उठवत असेल तर त्यावेळी नागरिकांनी, शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात संघटित होऊन संबंधित नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक व अपेक्षित आहे. आपलं हित आज शेतकरी सभेत सहभागी होण्यात आहे हे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे असे महत्त्वाचे आवाहन प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी शेतकरी जनतेच्या हितासाठी केले आहे. तसेच आधी उच्चांकी ऊस दर जाहीर करा, नंतरच प्रचाराची धुरा सांभाळा अशी ठाम भूमिका कारखान्यांबाबत शेतकऱ्यांची असली पाहिजे.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!