फलटण : फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी येथील कराळे अतिरिक्त डिपी (63) अडीच महिन्यांपूर्वी चोरीला गेला होता. वीज महावितरण शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी 29 नोव्हेंबर 2025 रोजी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन केली होती. सदर तक्रारीनंतर प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणचे अधिकारी ग्रामोपाध्ये, मोकाशी व आडम यांचेशी संपर्क साधुन वीज महावितरणकडून झालेल्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत, तसेच डीपी चोरीला गेलेला असल्यामुळे व वीज पुरवठा सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना येत असलेल्या विविध समस्यांबाबत सविस्तर माहिती देऊन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली होती.
त्याप्रमाणे प्रजा गटाच्या माध्यमातून व प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन 2 डिसेंबर 2025 रोजी तातडीने शेरेचीवाडी गावातील कराळे अतिरिक्त डिपी तात्काळ बसवण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फलटण तालुका प्रजा गट व वीज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.







