होळमध्ये (नलवडे वस्ती) लोड शेडिंगला “नो एन्ट्री”; प्रजा गटाचं दमदार कार्य

होळ : फलटण तालुक्यातील होळ गावातील नलवडे वस्तीवर १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसवण्याकरता दोन महिन्यांपासून स्ट्रक्चर उभे करून ठेवण्यात आले होते. परंतु सदर ठिकाणी लाईन ओढण्याचे काम व ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम दोन महिने झाले तरी रखडलेल्या अवस्थेत असल्याचे सोबतच्या छायाचित्रात दिसत आहे.

डीपी बसवण्याचे आदेश असताना देखील डीपी दोन महिन्यांपासून रखडलेला असल्याने लोड शेडिंगच्या त्रासामुळे येथील ग्रामस्थ शेतकरी प्रचंड त्रस्त होते. या ठिकाणी संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत लोड शेडिंग करण्यात येत होते. लोड शेडिंगमुळे ऐन उन्हाळ्यात उकाड्याचा त्रास, महिला माय माऊलींची स्वयंपाकाची अडचण, गाईंची दुधाच्या धारा काढण्याच्या समस्या, शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांची अभ्यासाची गैरसोय, आदी अशा प्रकारच्या समस्यांमुळे सर्वजण त्रस्त होते.

काही शेतकऱ्यांनी प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वीज महावितरण कडून नलवडे वस्ती, होळ येथील रखडलेली व अर्धवट राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रदीप झणझणे यांच्याकडे केली होती. सदर मागणीनंतर प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरण व ट्रान्सफार्मर बसवण्याचे कंत्राट घेतलेल्या संबंधित कंपनीचे अधिकारी यांचेशी सातत्याने समन्वय व संपर्क साधुन डिपी बसवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

त्याप्रमाणे प्रजा गटाकडून प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर होळ गावातील नलवडे वस्ती येथील शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन दि. २० एप्रिल २०२६ रोजी सदर डिपी तात्काळ बसवण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फलटण तालुका प्रजा गट व वीज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

नलवडे वस्ती, होळ येथील ग्रामस्थ व शेतकरी यांच्या आग्रहा खातर सर्व उपस्थित ग्रामस्थांसह नारळ फोडुन, पेढे वाटून, डिपीचे पूजन करण्यात आल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी सांगितले.

तसेच प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांचा सर्व शेतकऱ्यांच्या हस्ते पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. प्रदीप झणझणे यांनी सर्व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले व फलटण तालुक्यातील जनतेच्या जीवनातील अंधार दूर करुन त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचं कार्य पुढेही सातत्याने करणार असल्याची जिद्द मनोमन व्यक्त केली.

प्रजा गट जनसंपर्क कार्यालयाकडून होत असलेल्या निस्वार्थ कार्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण अनुभवायला मिळते. तसेच निवडणुकी अगोदर व निवडणूकी नंतरही फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर असल्याचे देखील मागील प्रदीर्घ कालावधीपासून पहायला मिळत आहे.

  • Related Posts

    फलटण तालुका अंधारात ; वीज महावितरण विरोधात जन आंदोलन उभारणार – प्रजा गट

    फलटण वीज महावितरणचा अन्यायी व अयोग्य कारभार

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण तालुका अंधारात ; वीज महावितरण विरोधात जन आंदोलन उभारणार – प्रजा गट

    फलटण तालुका अंधारात ; वीज महावितरण विरोधात जन आंदोलन उभारणार – प्रजा गट

    होळमध्ये (नलवडे वस्ती) लोड शेडिंगला “नो एन्ट्री”; प्रजा गटाचं दमदार कार्य

    होळमध्ये (नलवडे वस्ती) लोड शेडिंगला “नो एन्ट्री”; प्रजा गटाचं दमदार कार्य

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न
    error: Content is protected !!