प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

फलटण तालुक्यातील धनगरवाडा नं. २ हा डिपी (६३ केव्हीए) दहा दिवसांपुर्वी जळाला असल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांना दिली होती. सदर डीपी वीज महावितरण कडून तात्काळ बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन केली होती. सदर मागणीनंतर प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणचे अधिकारी ग्रामोपाध्ये, मोकाशी, आडम व माने यांचेशी संपर्क साधुन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली होती.

त्याप्रमाणे प्रजा गटाच्या माध्यमातून व प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर धनगरवाडा येथील शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन शुक्रवारी दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सदर डिपी तात्काळ बसवण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फलटण तालुका प्रजा गट व वीज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रजा गटाच्या माध्यमातून होत असलेल्या निस्वार्थ कार्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. तसेच निवडणुकी अगोदर व निवडणूकी नंतरही फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर असल्याचे देखील मागील प्रदीर्घ कालावधीपासून पहायला मिळत आहे.

  • Related Posts

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    निवडणूकी अगोदर व निवडणुकी नंतरही “फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर व उपलब्ध”

    error: Content is protected !!