भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने तीन राज्यातुन घेण्यात आलेल्या डिपार्टमेंटल परिक्षेमध्ये फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी गावचे सुपुत्र माऊली विजय सूळ यांची सहाय्यक प्रशासन अधिकारी वर्ग – १ पदावर नुकतीच निवड झाली आहे. माऊली सूळ यांच्या पदोन्नतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
माऊली सूळ यांचा जन्म ११ डिसेंबर १९९५ साली झाला असुन शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडी खुर्द, तर माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे पुर्ण केले. पुढे पुणे येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी काॅलेज याठिकाणी मेकॅनिकल डिप्लोमाचे शिक्षण पुर्ण केले.
संघर्षपूर्ण परिस्थितीमधुन शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरू झालेल्या नोकरीसाठीच्या लढाईत देखील माऊली सूळ हे दमदार यश मिळवत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे आय डी बी आय बँकेत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून रुजू झाले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्लार्क म्हणून काम पाहिले. त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळात सलग पाच वर्षे सेवा देत सध्या विटा शाखेत माऊली सूळ हे सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत होते. भारतीय आयुर्विमा महामंडळात नुकतीच त्यांची पदोन्नती होऊन गुजरात राज्यातील सुरत येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी वर्ग – १ या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे.
फलटण तालुक्यातील विविध मान्यवर व डोंबाळवाडी ग्रामस्थ, तसेच सर्व मित्र परिवाराकडून माऊली सूळ यांचेवर अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







