प्रजा गटाच्या वतीने अंकुशराव साळुंखे यांचा सत्कार ; साळुंखे यांची सातारा जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमन पदी निवड

फलटण : सहकार, सामाजिक, राजकीय व कामगार क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या अंकुशराव साळुंखे यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि लघुउद्योजक यांच्यासाठी उल्लेखनीय काम केले आहे. अंकुशराव साळुंखे यांचे वडील सुरवडी गावचे सरपंच असल्यामुळे अंकुशराव साळुंखे यांच्या मनामध्ये सामाजिक कार्याची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली व तेव्हापासूनच त्यांचा सामाजिक कार्यातला सहभाग लक्षणीय आहे. तसेच १९९६ सालापासून ते आज पर्यंत तब्बल ३० वर्षे अखंडितपणे राजे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या या निष्ठेचा, नेतृत्वगुणांचा व सहकार क्षेत्रातील अनुभवाचा विचार होऊन, सातारा जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन या महत्त्वाच्या पदावर निवड करून शिवसेना राजे गट नेतृत्वाकडून अंकुशराव साळुंखे यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अंकुशराव साळुंखे यांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळण्यास मदत होणार असून मजूर फेडरेशनच्या माध्यमातून कामगार कल्याणाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील, असा विश्वास प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच सुरवडी गावासह फलटण तालुक्याच्या नावलौकिकात भर घालणारी ही निवड असल्याची भावना देखील प्रदीप झणझणे यांनी व्यक्त करून दाखवली.

सातारा जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अंकुशराव साळुंखे यांचा फलटण तालुका प्रजा गटाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. प्रजा गट जनसंपर्क कार्यालय फलटण येथे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे व सर्व मित्र समूहाने यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे नवनिर्वाचित चेअरमन अंकुशराव साळुंखे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्था तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!