विधान परिषदाही ग्रामपंचायतीप्रमाणे बिनविरोध होणे महाराष्ट्राला भूषणावह नाही – प्रजा गट फलटण

फलटण : राज्यातील विधान परिषद निवडणुका बिनविरोध होण्याची वाढती प्रवृत्ती ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकशाही परंपरेस भूषणावह नसल्याची प्रतिक्रिया प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राने नेहमीच वैचारिक राजकारण, सशक्त विरोधी भूमिका आणि लोकशाही मूल्यांची परंपरा जपली आहे. अशा राज्यात विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या लोकशाही संस्थेच्या निवडणुका बिनविरोध होणे ही चिंतेची बाब असल्याचे झणझणे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, “ग्रामपंचायतींच्या निवडणुका गावाच्या विकासासाठी अनेकदा सर्वानुमते बिनविरोध होतात. मात्र विधान परिषद ही राज्याच्या धोरणांवर चर्चा करणारी आणि सरकारला जाब विचारणारी महत्त्वाची संस्था आहे. अशा संस्थेतील निवडणुका स्पर्धात्मक होणे हे लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक आहे.”

बिनविरोध निवडीमुळे लोकशाहीतील राजकीय स्पर्धा, विचारांचे प्रतिनिधित्व आणि मतदारांपुढे पर्याय ठेवण्याची प्रक्रिया कमकुवत होण्याचा धोका आहे . तसेच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी निवडणुकांमध्ये निरोगी स्पर्धा आणि विविध मतप्रवाहांना संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

“विधान परिषदाही ग्रामपंचायतीप्रमाणे बिनविरोध होणे हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला शोभणारे नाही. लोकशाहीचे सौंदर्य हे स्पर्धेत, विचारांच्या संघर्षात आणि जनतेसमोर पर्याय उपलब्ध करून देण्यात आहे,” असे प्रदीप झणझणे यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!