शेतकऱ्यांच्या हाकेला धावला प्रजा गट; प्रदीप झणझणे यांचं दमदार कार्य

फलटण : मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डीपी २७ मे २०२६ रोजी चोरीला गेला होता. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, वीज महावितरणकडून तातडीने प्रतिसाद न मिळाल्याने १ जून २०२६ रोजी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रजा गट जनसंपर्क कार्यालय, फलटण येथे जाऊन प्रदीप झणझणे यांची भेट घेतली.

यानंतर प्रदीप झणझणे यांनी शेतकऱ्यांसह फलटण वीज महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी परिसरातील चोरीला गेलेल्या पाच डीपींपैकी ४ एप्रिल २०२६ रोजी चोरी झालेला यादीतील पहिला डीपी अद्याप बसविणे बाकी असून, यादीतील पाच डिपी बसवल्या नंतरच सासवड येथील डीपीचा नंबर लागेल, अशी भूमिका मांडली.

या उत्तरावर समाधान न मानता प्रदीप झणझणे यांनी सातारा जिल्हा वीज महावितरणचे मुख्य अभियंता हळनोर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून फलटण वीज महावितरण कार्यालयाच्या अयोग्य कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच डीपी चोरीला गेला अथवा डीपी नादुरुस्त झाला तरी शेतकऱ्यांना दोन दिवसात वीज महावितरणने नवीन डीपी बसवून दिला पाहिजे या नियमाची वीज महावितरणला आठवण करून दिली. त्यानंतर मुख्य अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून झणझणे सासवड येथील मांगवाडा डीपी त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

या पाठपुराव्याला यश येत ६ जून २०२६ रोजी झणझणे सासवड येथील मांगवाडा डीपी क्रमांक १ वीज महावितरणकडून बसविण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.

डीपी सुरू झाल्यानंतर आनंद व्यक्त करत परिसरातील शेतकऱ्यांनी प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे तसेच वीज महावितरणचे आभार मानले. प्रदीप झणझणे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!