श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

सासवड, ता.फलटण : फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सासवड येथील युवा उद्योजक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल शिवाजीराव रासकर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम राबवला. महात्मा फुले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सासवड तसेच जिल्हा परिषद शाळा, सासवड येथे विद्यार्थ्यांना वह्या व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महात्मा फुले हायस्कूलमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

अमोल रासकर गेल्या सलग सहा वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असून त्यांच्या माध्यमातून सासवड परिसरातील अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली आहे. याशिवाय वाड्या-वस्तीवरील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करून शिक्षणाचा प्रवास सुलभ करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास ती सोडवण्यासाठी अमोल रासकर आणि त्यांचा मित्रपरिवार नेहमीच तत्पर असतो.

या कार्यक्रमावेळी सासवडचे माजी उपसरपंच धर्मवीर अनपट, शिवनंदन पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार झणझणे, शिवसेना शाखाप्रमुख निलेश अनपट, सचिव केतन जाधव, नवनाथ जगताप, अमोल अनपट, हनुमंत खोमणे तसेच जिल्हा परिषद शाळा व महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळांच्या विकासासाठी व शैक्षणिक कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मुख्याध्यापक व शिक्षकांनी अमोल रासकर यांच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करत सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!