गोवर प्रतिबंधक लसीपासून एकही बालक वंचित राहू नये- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि. 28: सातारा जिल्ह्यात एकूण 41 आश्रम शाळा आहेत. या शाळेतील एकही विद्यार्थी गोवर आजाराच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाची मोहिम 15 ते 30 सप्टेंबर कालावधीत राबविण्यात यावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 41आश्रम शाळेत 5 हजार 68 विद्यार्थी आहेत. यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी लसीकरण देण्याबाबत वेळापत्रक तयार करावे. या वेळापत्रकानुसार आश्रम शाळांना कळविण्यात यावे. ज्या आश्रम शाळेत जास्त बालके आहेत त्या आश्रम शाळेत पहिल्यांदा लसीरकणाची मोहिम राबवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.

नागरिकांना आरोग्य सुविधा चांगल्या व जलदगतीने मिळाव्यात यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे आष्युमान भारत कार्ड काढुन त्यांना त्वरीत वाटप करावे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक तालुक्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शिबीर आयोजित करुन येत्या 10 दिवसात उद्दिष्ट पूर्ण करावे. या कामासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची मदत घ्यावी. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचेही आरोग्य मित्रांकडून आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.
0000

  • Related Posts

    “मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियान” अंतर्गत सुरवडी ग्रामपंचायतीचा सन्मान

    सातारा, ११ सप्टेंबर :सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने “मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियान” अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ग्रामीण विकास व पंचायत राज क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फलटण…

    सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा-कोल्हापूर रस्त्याच्या पूर्णत्वाची मुदत वाढवून मार्च 2026 केली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डिसेंबर 2025 पर्यंत रस्त्यावरील वाहतुकीचे अडथळे दूर करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोंबरपर्यंत कराड येथील उड्डाणपुलावील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    निवडणूकी अगोदर व निवडणुकी नंतरही “फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर व उपलब्ध”

    निवडणूकी अगोदर व निवडणुकी नंतरही “फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर व उपलब्ध”
    error: Content is protected !!