“मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियान” अंतर्गत सुरवडी ग्रामपंचायतीचा सन्मान

सातारा, ११ सप्टेंबर :
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने “मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियान” अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ग्रामीण विकास व पंचायत राज क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत सुरवडी व सौ. शरयू जितेन्द्र साळुंखे-पाटील ( सरपंच, ग्रामपंचायत सुरवड़ी) यांना सन्मानित करण्यात आले. सुरवडी ग्रामपंचायतीचा सन्मान स्वीकारताना ग्रामसेवक शशिकांत माने हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात मा. ना. जयकुमार गोरे (मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य), मा. ना. शंभुराज देसाई ( पालक मंत्री, सातारा जिल्हा), आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. याशनी नागराजन, डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (IAS), जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, तसेच ग्रामविकासाशी निगडित अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विकासात्मक उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

  • Related Posts

    सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा-कोल्हापूर रस्त्याच्या पूर्णत्वाची मुदत वाढवून मार्च 2026 केली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डिसेंबर 2025 पर्यंत रस्त्यावरील वाहतुकीचे अडथळे दूर करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोंबरपर्यंत कराड येथील उड्डाणपुलावील…

    गोवर प्रतिबंधक लसीपासून एकही बालक वंचित राहू नये- जिल्हाधिकारी संतोष पाटील

    सातारा दि. 28: सातारा जिल्ह्यात एकूण 41 आश्रम शाळा आहेत. या शाळेतील एकही विद्यार्थी गोवर आजाराच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!