हिंगणगाव पंचायत समिती गणाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक – सतीश शिंदे

सतीश शिंदे यांचा फलटण तालुक्यातील लोकसंपर्क दांडगा असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. मागील काळात लोकनेते स्व. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जवळपास १५ ते २० वर्षे एकनिष्ठ राहुन लोकसेवेचे महत्वाचे काम केले आहे. पुढे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून फलटण तालुका उपाध्यक्ष पदावर जवळपास दहा वर्षे सक्रियपणे कार्यरत राहून लोकांना न्याय व सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे सतीश शिंदे यांनी स्पष्ट केले.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील रखडलेली विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी “विकास पुरुष” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच मंत्री मकरंद पाटील व राज्यसभा खासदार नितीन पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर व फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, तसेच फलटण तालुक्यातील सर्व वरिष्ठ नेते-पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणण्यामध्ये देखील त्यांचे योगदान आहे. सध्या सतिश शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फलटण तालुका उपाध्यक्ष या महत्त्वाची जबाबदारी असलेल्या पदावर कार्यरत असून लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होत लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते पार पाडत आहेत.

फलटण पश्चिम भागात स्थानिक पातळीवर लोकांशी सातत्याने संपर्कात असल्यामुळे त्यांचा जनाधार प्रचंड मोठा आहे. हिंगणगाव पंचायत समिती गणासाठी निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) फलटण तालुका उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी त्यांच्या पत्नी सौ. सुनिता सतीश शिंदे यांच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या या भूमिकेचा नक्कीच विचार करावा लागणार असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!