कृष्णा….! द्रौपदीला वाचवायला आलास, संपदाला का नाही ?

इथे ही एक मार्मिक तुलना या ठिकाणी आजच्या जनतेला दाखवण्यासाठी आपण केली आहे. कृष्णाने द्रौपदीला वाचवणे ही एक ऐतिहासिक व पौराणिक घटना आहे, तर डॉ. संपदा मुंडे या महिला भगिनीचा भ्रष्ट व्यवस्थेने अत्याचार करुन, शारीरिक व मानसिक छळ करुन प्राण घेतलेले दुर्दैवी प्रकरण ही आजच्या युगातील एक वास्तविक जीवनातील शोकांतिका आहे. सरकार आणि प्रशासकीय विभागांची जबाबदारी आहे की त्यांनी नागरिकांचे, विशेषतः जे असुरक्षित आहेत किंवा मदत मागत आहेत, त्यांचे संरक्षण करणे जनतेला व लोकशाहीला अपेक्षित आहे.

डॉ. तरुणीच्या बाबतीत, तिने वारंवार तक्रारी करून व मदत मागुनही, कोणतीही कारवाई सरकार व प्रशासनाकडुन करण्यात आली नाही, ज्यामुळे शेवटी तिचा दुःखद मृत्यू झाला. छळ आणि कायद्याच्या गैरवापराच्या प्रकरणांमध्ये जबाबदारी आणि वेळेवर हस्तक्षेपाचे महत्त्व किती आहे याचं हे प्रकरण एक ज्वलंत उदाहरण आहे.

दैवी हस्तक्षेप व मानवी जबाबदारी “द्रौपदी व संपदा” या दोन्ही कालखंडातील परिस्थितींमधील प्रमुख फरक आहे. द्रौपदी घटनेत कृष्णाच्या कृतींना दैवी हस्तक्षेप म्हणून पाहिले जाते, तर डॉ. तरुणीच्या बाबतीत, नागरिकांचे संरक्षण करणे ही सरकार, प्रशासन व पोलिसांची जबाबदारी असल्याचं सिद्ध करते..

द्रौपदी घटनेत, कृष्णाने तातडीने हस्तक्षेप करून तिला सहकार्य केले, तर डॉ. तरुणीच्या बाबतीत, तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले, ज्यामुळे विनाशकारी परिणाम घडले. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी तिच्या तक्रारींकडे, तिच्या आक्रोशाकडे, तिच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले, त्या सर्व लाचार व हतबल झालेल्या अधिकाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच फलटण सह महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे.

वास्तविक जीवनात अशा दुर्घटनांना तोंड देण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणेची आवश्यकता आहे, जी सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात नाही हेच या तुलनेतून अधोरेखित होते.

महाभारताच्या युद्धात दुष्ट कौरवांचे चक्रव्युह अभिमन्यूने भेदले. पण तो कौरवांच्या कपटी चक्रव्युहात सापडला आणि शेवटी वीरगतीला प्राप्त झाला. डॉ. तरुणीच्या बाबतीत इथे तिने देखील आजचं हे सरकारी व्यवस्थेचं भ्रष्ट झालेलं चक्रव्यूह नक्कीच भेदलं आहे यात काही शंका नाही. तिने भ्रष्ट व्यवस्थेशी दिलेला एकाकी लढा आता फलटणकर जनतेनं पुढे चालू ठेवणे अपेक्षित आहे. कृष्णा परमात्म्या महाभारता प्रमाणे सत्याच्या विजयासाठी पुढची सुत्रे देखील हातात घ्यायला तु येशील आणि पापानं थैमान घातलेल्या दुष्टांना महादंड देऊन न्यायाचं राज्य पुन्हा प्रस्थापित करशील यात काही शंका वाटत नाही.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!