झिरपवाडी, ता.फलटण : श्री गणेश चतुर्थी निमित्त फलटण तालुक्यातील सुप्रसिद्ध नाडी तज्ञ डॉक्टर सन्माननीय श्री. संतोषजी भिवरकर सर, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री. प्रदीप झणझणे व सर्व सहकारी आज शनिवारी दि. 08/11/2025 रोजी सायंकाळी 7.00 pm वाजता झिरपवाडी गावातील गणेश नगर येथील श्री गणेश मंदिरात “आजार व आयुर्वेद” या महत्वपूर्ण विषयावर प्रबोधन व मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या गावात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे नम्रपूर्वक आवाहन झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ. रेखा नवनाथ गुंजवटे व सौ. कोमल नवनाथ गुंजवटे यांनी केले आहे.
या उपक्रमामध्ये सर्व प्रकारचे “आजार” व त्यावरील रामबाण औषध म्हणजे “आयुर्वेद” या दोन महत्वपूर्ण विषयावर डॉ. भिवरकर सर महत्त्वाची माहिती प्रदान करणार असून सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांकडुन करण्यात आली आहे.







