फलटणकर जनतेसाठी योग्य व पोषक असणारी भूमिका साकारणार – प्रजा गट

फलटण नगरपालिकेची निवडणूक नुकतीच लागलेली आहे. सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रजा गटाची नेमकी भूमिका काय असणार, याबाबत विविध माध्यमांनी विचारणा केल्यानंतर प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

माध्यमांशी बोलताना प्रदीप झणझणे यांनी सांगितले की फलटण तालुक्यातील जनतेला अपेक्षित असणारी व योग्य ठरणारी भूमिका प्रजा गटाची असणार आहे. नेहमीप्रमाणे जनतेचा आतला आणि खरा आवाज ऐकूनच प्रजा गट आपली भूमिका ठरवणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रजा गटाचे सर्व कार्यकर्ते, फलटण शहर व फलटण तालुक्यातील प्रजा गटाचा असणारा एक मोठा चाहता वर्ग, तसेच शहरातील नागरिक या सर्वांशी विचारविनिमय केल्यानंतर कोणत्या गटाला किंवा पक्षाला पाठिंबा द्यायचा यासाठीची भूमिका प्रजा गट जाहीर करणार असल्याचे प्रदीप झणझणे यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीतील सर्वात मोठी शक्ती असलेली “जनता” सर्व स्तरामध्ये सर्वोच्च असुन आपण व आपला संपूर्ण प्रजा परिवार मागील दोन दशकांपासून फलटण तालुक्यातील जनतेसाठी निस्वार्थपणे काम करत आहे. प्रजा गटाची भूमिका फलटण नगरपालिका निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!