एकनाथ शिंदेंच्या सभेने फलटणच्या राजकारणात रामराजेंची डरकाळी

फलटण : फलटण शहरामध्ये नगरपरिषद निवडणुक प्रचाराची लोकशाही मार्गाने जोरदार लढाई सुरू आहे. त्यातच शुक्रवारी दि. 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या फलटण शहरात झालेल्या सभेने राजकीय वातावरण प्रचंड तापले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजे गटाने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेश प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे देखील स्टेजवर उपस्थित होते. श्रीमंत रामराजेंनी आपल्या भाषणामध्ये, मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी महायुतीचा घटक पक्ष या नात्याने उपस्थित असल्याची चाणाक्ष शब्दखेळी केल्यावर समोरील उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये कोणालाच आपले हसू आवरता आले नाही.

मागील वर्षात झालेल्या तब्बल दोन मोठ्या निवडणुकानंतर (लोकसभा व विधानसभा) श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अखेर सुरू असलेल्या फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या वातावरणात राजकीय व्यासपीठावर उपस्थित राहिल्याचे सर्वांनी पाहिले. यावेळी श्रीमंत रामराजे यांनी, मी महायुतीमधील मित्रपक्ष म्हणून उपस्थित असल्याचा दाखला दिला. फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या श्रीमंत अनिकेत राजेंच्या राजकीय कारकीर्दीची यशस्वी सुरुवात घडवण्यासाठीची श्रीमंत रामराजे यांची चाणाक्ष, संयमी व प्रसंगावधान राखणारी खेळी सर्व उपस्थितांनी अनुभवली. रामराजे यांनी आपल्या भाषणात समोर बसलेली फलटणकर जनता व कार्यकर्ते ही माझी लेकरं असुन आमचं घर व आमच्या मुलाबाळांना पोलीस चौकीचं जर काही राजकारण झालं तर आम्हाला संरक्षण द्या. तसेच फलटणमधील प्रशासकीय कार्यालयांवर प्रचंड दहशत असल्याचेही त्यांनी यावेळी वक्तव्य केले.

एकनाथ शिंदे यांची फलटण शहरांमध्ये जोरदार एंट्री झाली आणि फलटण शहरातील संपूर्ण वातावरण शिवसेनामय व भगवे झाल्याचे दिसत होते. एकनाथ शिंदे आले व त्यांच्या भाषणाने संपूर्ण राजे गट व शिवसेनेमध्ये विजयाचा उत्साही हुंकार भरला आणि भिनवला सुद्धा. एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणाने अक्षरशः फलटणचं राजकीय मैदान दणाणून सोडलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय सत्तेच्या अधिकारातून आपल्या मंत्रिमंडळातील व पक्षातील विविध सहकारी मंत्र्यांशी थेट फोन द्वारे संपर्क करून फलटणकरांना विविध सर्वांगीण विकासाची ठामपणे आश्वासने दिली, ज्याने फलटणच्या राजकारणात एक प्रकारे शिवसेनेच्या कामाचा वचक आणि दरारा दिसुन येत होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना उद्देशून, “शेर कभी बुडा नही होता, शेर शेर ही होता है, चाहे वो जंगल का हो या राजनीति का, असे गौरवोद्गार काढले. त्यावेळी संपूर्ण गजानन चौकाचा आसमंत टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांनी दणाणून गेला. एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की मी फलटणकरांना दहशतमुक्त व भयमुक्त वातावरण देण्यासाठी आलेलो आहे. एकनाथ शिंदे शांत आहे, परंतु जर कोणी विनाकारण, जाणून बुजून आडवं आलं तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होतो असे देखील ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले. तसेच फलटणमध्ये घडलेले मृत डॉक्टर युवतीचे प्रकरण गंभीर असून त्यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून संबंधित परिवारास न्याय मिळवून देणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. भाषणात शेवटी एकनाथ शिंदे यांनी फलटणकरांना फलटण नगरपरिषद निवडणुकीमधील शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे यांचे सह सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी व फलटणचा विकास करण्यासाठी शिवसेनेला एक संधी देण्याची विनंती केली.

  • Related Posts

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    शेतकऱ्यांच्या हाकेला धावला प्रजा गट; प्रदीप झणझणे यांचं दमदार कार्य

    शेतकऱ्यांच्या हाकेला धावला प्रजा गट; प्रदीप झणझणे यांचं दमदार कार्य

    “भाजपविरोधात अभयसिंहांचा हल्लाबोल; ‘अन्यायी प्रवृत्तीविरोधात माझी स्वाभिमानाची लढाई!'”

    “भाजपविरोधात अभयसिंहांचा हल्लाबोल; ‘अन्यायी प्रवृत्तीविरोधात माझी स्वाभिमानाची लढाई!'”
    error: Content is protected !!