नर्मदा कॉम्प्युटर्सच्या वतीने लोणंदमध्ये ए.आय. कार्यशाळा संपन्न

लोणंद : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक साधनांचा वापर करून आपले ज्ञान व कौशल्य अधिक कार्यक्षम पद्धतीने वाढवावे या उद्देशाने नर्मदा कॉम्प्युटर्स, लोणंद यांच्या वतीने व संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद येथील मालोजीराजे विद्यालयात इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या उपक्रमात सुमारे 130 ते 150 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत माहिती देऊन तिचा शैक्षणिक व दैनंदिन जीवनातील कार्यक्षम वापर कसा करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना ChatGPT, Gemini, Heygen यांसारख्या अत्याधुनिक साधनांची माहिती देऊन प्रत्यक्ष वापराची संधीही देण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संवाद लेखन, सादरीकरण निर्मिती, तसेच शैक्षणिक उपक्रमांसाठी ए.आय.चा प्रभावी वापर प्रत्यक्ष अनुभवला.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रकांत जाधव सर यांनी विशेष परवानगी व प्रोत्साहन दिले. तसेच श्री. ज्ञानेश्वर जाधव सर यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्याचे मत विद्यालयीन शिक्षकवर्ग तसेच आयोजकांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    कृषी महाविद्यालयात नवीन कृषीपूरक प्रकल्पांचे उद्घाटन; विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा

    फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयात विविध कृषीपूरक प्रकल्पांचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळून ते भविष्यात स्वतःचे कृषी उद्योग उभारतील आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!