कृषी महाविद्यालयात नवीन कृषीपूरक प्रकल्पांचे उद्घाटन; विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयात विविध कृषीपूरक प्रकल्पांचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळून ते भविष्यात स्वतःचे कृषी उद्योग उभारतील आणि परिसरातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कृषी उत्पादने मिळतील, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कृषी संजीवनी जैविक खते व कीडनाशके उत्पादन प्रकल्प, दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रकल्पाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक मार्गदर्शनच नव्हे, तर कौशल्य विकासाची संधी मिळेल. तसेच, परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या निविष्ठांचा वापर करून आपल्या उत्पादनात भरघोस वाढ साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.

  • Related Posts

    वीज महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर | गेला सहा निष्पाप गाईंचा बळी : प्रजा गट

    मृत अवस्थेत दिसत असलेल्या सहा गाई

    अमोल रासकर यांची बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदी वर्णी

    कार्यक्षम युवा नेतृत्व व झणझणे सासवड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अमोल रासकर यांच्या कार्य, कर्तृत्वाची व निष्ठेची गंभीर दखल घेत नेतृत्वाकडून फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष निमंत्रित स्वीकृत संचालक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!