निवडणुका लागल्या की नेत्यांना विकास करायचा असतो- प्रदीप झणझणे, संपादक, प्रजा जन

फलटण : महाराष्ट्र राज्यात नगरपालिका निवडणुकांचं धुमशान सुरू आहे. फलटण शहरातील नगर परिषदेची निवडणूक देखील याला अपवाद नाही. जवळपास तब्बल नऊ वर्षानंतर फलटण नगर परिषदेची निवडणूक होत आहे. पाच वर्षे मतदार जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कारभार पाहत होते, तर चार वर्षे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशासक म्हणून फलटण शहराचं कामकाज पाहण्यासाठी कार्यरत आहेत. तब्बल नऊ वर्षांचा प्रचंड मोठा असा काळ गेला, परंतु येथील शहरातील जनतेला अभिप्रेत असणारा समाधानकारक असा विकास झालेला नाही. नऊ वर्षानंतर आता जेव्हा निवडणुका सुरू आहेत त्यावेळी मात्र घोषणांचा मागील निवडणुकांप्रमाणेच ढगफुटीसारखा भरमसाठ पाऊस पडत आहे. विकासाच्या घोषणा करणारे, आश्वासन देणारे दोन्ही गट तेच आहेत, दोन्ही गटाचे नेते देखील तेच आहेत. परंतु फलटण शहराचा कायापालट होऊन त्याचा विकासामध्ये कणभर देखील रूपांतरीत झालेली सकारात्मक परिस्थिती अजिबात दिसत नाही. उलट निच्चांकी पद्धतीने विकासाची घसरण फलटण शहरांमध्ये रोज सुरू आहे. एखाद्या ठिकाणची जी काही चांगली किंवा वाईट परिस्थिती असते, त्याकरिता जेवढा सत्ताधारी गट जबाबदार असतो, तेवढाच विरोधी गट देखील त्यासाठी जबाबदार असतो हे कदापी नाकारता येणार नाही. फलटण शहर देखील याला अपवाद नाही. निवडणुका लागल्या की विकासाचा विषय सुरू होतो. विकासच करायचा आहे तर फलटण तालुक्यातील चार कारखान्यांना ऊसदर जाहीर करायला वेळ का लागतो. शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेण्याअगोदर ऊस दर जाहीर करणे हे तर कारखान्यांच्याच हातात आहे ना. ऊस दर जाहीर करताना मात्र हात आखडता घ्यायचा. विकासच करायचा असेल तर नेत्यांनी 3600 रुपये शेतकऱ्यांना ऊसदर द्यायला काय हरकत आहे. फलटणकर शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यास येथील कारखाने कधी हातभार लावणार. प्रचार यंत्रणेवरील खर्च जोमात सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठीचा शेतकऱ्यांच्या हक्काचा योग्य ऊसदर मात्र कोमात आहे. सर्व शेतकरी फलटणकर जनतेने याचा गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

फलटणमधील दोन प्रमुख गट दीर्घ कालावधीपासून फलटणमध्ये प्रस्थापित आहेत. मागील काळ सोडला तर सहा वर्षांच्या कालावधीपासून दोन्ही गटाकडे सत्ता आहे. परंतु फलटण शहरा मधून विकास नावाचा शब्दच अनोळखी झाला आहे. फलटण शहरातील लोकांना रोज येथील रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागतो, प्रचंड मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागतो, पाऊस थोडासा जास्त झाला तर इथे घराघरात पाणी घुसत असते, रस्त्यावर पाणी साचत असते, सर्वत्र ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो, यामुळे मच्छर-डास यांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे, यामुळे रोगराई वाढत आहे, फलटण शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. फलटण शहरातील रविवारच्या आठवडी बाजाराला शेतकरी व व्यापाऱ्यांची बसण्यासाठीची मंडईची व्यवस्था बिलकुल दर्जेदार नाही, सातत्याने आठवडी बाजाराच्या जागेची पळवा पळवी केली जाते. शहरांमध्ये मुताऱ्यांची व्यवस्था नाही, ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेची, विशेषतः स्त्रियांची तर प्रचंड मोठ्या प्रमाणात कुचुंबना होते. शहरांमधील रस्त्यावर मोकाट कुत्रे, जनावरे यांचा कळप रस्त्यावर फिरत असतो, बसलेला असतो, यामुळे वाहतुकीस अडथळे येतात, अपघात होतात, जीवितास धोका निर्माण होतो, अतिक्रमणे, पार्किंगची दुर्व्यवस्था. शहरातील गार्डन, बाग बगीचा, उद्यानांचा अभाव, प्रशासकीय सेवा सुविधा नागरिकांना निष्पक्षपणे मिळण्याचा अभाव, प्रशासनावर अंकुश नाही, शहर व ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर चोऱ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहेत, ट्रान्सफाॅर्मर चोऱ्या रोखण्यामध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे, प्रमुख रस्त्यावर वारंवार सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे नागरिक हैराण होत आहेत, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा आहे, फलटण शहरांमध्ये डॉक्टर युवतीचे दूर्दैवी मृत्यू प्रकरण, कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे, आदी अशा अनेक असंख्य समस्या फलटण शहरातील नागरिकांना सातत्याने वारंवार भेडसावत असतात. रोज दैनंदिन पद्धतीने फलटणकरांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. फलटणची बारामती करण्यासाठी फलटणकर जनतेकडुन आमदार बदलला गेला. परंतु एक वर्ष झाले तरीही फलटण शहरांमध्ये म्हणावा असा बदल दिसून आला नाही, फलटण शहराची परिस्थिती पूर्वीपेक्षाही जास्त चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत कोणत्या पक्षाची किंवा गटाची सत्ता येते हे पाहणे उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!