संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

२०२१४ पासुन जसे नरेंद्र मोदी भाजपचे प्रमुख नेते बनले तेव्हापासून भाजपकडून राहुल गांधी यांचा उल्लेख पप्पू म्हणून केला जाऊ लागला, राहुल गांधींना पप्पू नावाने हिणवले जात होते. परंतु तोच पप्पू 2026 मध्ये सत्ताधारी भाजपच्या स्व:पक्षहिताच्या स्वार्थी धोरणांच्या (फेकी) गोलंदाजीवर चौकार व षटकार मारताना आक्रमक पवित्रा धारण केलेल्या स्वरुपात दिसुन येत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे परवाचं सत्ताधारी भाजप सरकारने मांडलेलं व नामंजूर झालेलं संसदेतील “लोकसभा जागा वाढीचे दुरुस्ती विधेयक”.

भाजप सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलीमिटेशन म्हणजेच लोकसभेतील मतदार संघाच्या जागांची पुनर्रचना करणार असल्याची खात्रीलायक चर्चा देशभरात सुरू होती. लोकसभेतील सदस्य असणाऱ्या खासदारांच्या जागा ५४३ वरून जवळपास ८५० पर्यंत वाढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

२०१४ पासुन “नमो” प्रेमाने मोहीत झालेली जनता देखील आता भानावर यायला लागली आहे. २०१४ पासुनच्या भाजप सरकारच्या प्रत्येक कृतीवर जनता आता प्रतिक्रिया द्यायला लागली आहे. सरकार बद्दल प्रचंड नाराजी वाढत आहे. भाजप खासदारांची संख्या २४० वर आली असून, बहुमत असणारे सरकार हे आता इतर पक्षांच्या साहाय्याने चालताना दिसत आहे. हे चित्र असेच सुरू राहिले तर येणाऱ्या निवडणुका जिंकणे कठीण असल्याचे भाजपाला समजले आहे. त्यावर उतारा म्हणून लोकसभेतील जागा वाढवणे, मतदारसंघांची पुनर्रचना करणे आणि आपल्याला हवे तसे मतदारसंघ रचणे, यासाठीच ही घटनादुरुस्ती होती, हे आता भारतीय जनतेच्या लक्षात येऊ लागलं आहे.

विरोधकांच्या मते, भाजपला मानणारा वर्ग ज्या भागात मोठ्या प्रमाणात आहे तिथे जागा वाढवायच्या आणि ज्या भागात भाजपची निवडुन येण्यासारखी परिस्थिती नाही तिथे जागांची परिस्थिती जैसे थे, तेथे जास्तीच्या जागा वाढवायच्या नाहीत असा काहीसा प्रकार. तसेच मतदार संघ पुनर्रचना सोयीनुसार तोडाफोडी व जोडाजोडी करणे. असे देशहित विरोधी व राजकीय कुटनितीने परिपूर्ण असणारे धोरणी विधेयक काँग्रेस व विरोधकांनी आक्रमकपणे संसदेतून हद्दपार केले.

ओढवलेल्या नामुष्कीमुळे पंतप्रधान मोदींच्या भाषणात फक्त आणि फक्त काँग्रेस व विरोधकां प्रती प्रचंड असलेला रोष व्यक्त होत होता. काँग्रेस औषधाला देखील शिल्लक राहणार नाही पासून सुरू झालेला प्रवास ते “पुढील निवडणुका सहजपणे जिंकता याव्यात यासाठी भाजपने मांडलेले दुरुस्ती विधेयक काँग्रेस व विरोधकांच्या एकजुटीमुळे नामंजूर होऊन काँग्रेस समोर भाजप निष्प्रभ झाल्याचे दिसणे, ते पंतप्रधान मोदींच्या “स्वपक्ष की बात” च्या भाषणात फक्त काँग्रेस, काँग्रेस आणि काँग्रेस चा असंख्य वेळा झालेला नामोल्लेख हा, राहुल गांधी हे आता पप्पू नाही तर देशाचे सक्षम नेते म्हणून भारतीय जनतेसमोर नवा पर्याय तयार झाला असल्याचे स्पष्टपणे सुचित व अधोरेखित होत होते. मोदींचा थयथयाट सर्व भारतीयांनी “याची देही, यांची डोळा” पाहिला आहे, आता पुढील निर्णय भारतीय जनतेच्या कोर्टात आहे.

  • Related Posts

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार
    error: Content is protected !!