पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांहस्ते शुभारंभ

राज्यात प्रथमच या संकल्पनेची सुरुवात

घरबसल्या लोकांना योजनांचा लाभ मिळणार

सातारा दि. 26:
नागरिकांना देय असणाऱ्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला उपक्रम राज्यात प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जी टीम काम करणार आहे त्या टीमने अत्यंत सेवाभावीवृत्तीने हे कार्य करावे, पालकमंत्री आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राज्यात प्रथमच आपल्या जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी आवश्यक ते सर्व सहकार्य सत्वर करावे. हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने जिल्ह्यात राबविला जाईल व राज्यासाठी तो आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे पालकमंत्री श्री. देसाई व सात ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोम्पे विशेष कार्य अधिकारी सुनील गाडे, तहसीलदार अनंत गुरव, पालकमंत्री कार्यालयाचे समन्वयक गजानन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्र्यांसह ज्या सात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला त्यामध्ये डी. वाय. पाटील, पांडुरंग सुर्वे, आत्माराम सूर्यवंशी, बंडू देसाई, काशिनाथ जाधव, सुमित्रा शिर्के, ताराबाई साळुंखे या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, राज्यात प्रथमच पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जनतेच्या अडीअडचणी त्यांच्या दारात जावून जाणून घेण्यात येणार आहेत. तरी जनतने आपले प्रश्न, तक्रारी किंवा शासकीय कामाबाबत अडचणी असतील तर त्या कागदपत्रांसह पालकमंत्री कार्यालयातील समन्वयकांकडे द्याव्यात. समन्वयकांची टीम यासाठी पाठपुरावा करेल, नागरिकांकडून त्यांच्या कामांचे अर्ज भरून घेतले जातील. प्राप्त तक्रारींचा निपटारा जलगतीने पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात येईल. विविध शासकीय कार्यालयांना संबंधित कामाच्या पूर्ततेबाबत सूचना दिल्या जातील व त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. एखादे काम होण्यामध्ये काही अडचणी असल्यास त्यामधून मार्ग काढला जाईल. तसेच या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरनिहाय केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभही मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पाटण मतदारसंघ हा डोंगरी मतदारसंघ आहे. छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागतात. हे थांबावे म्हणून पालकमंत्री आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पालकमंत्री कार्यालयाने नियुक्त केलेले समन्वयक हे प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांच्या कामांसह त्यांना कोणत्या योजनेचा लाभ देय आहे, याबाबत अभ्यास करून जागेवरच त्यांचे अर्ज भरून घेतील व त्यांना पोच देऊन संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवतील. नागरिकांना त्यांच्याशी संबंधित सर्व योजनांचा लाभ घरबसल्या मिळावा यासाठी समन्वयकांची टीम पाठपुरावा करेल. तांत्रिक अडचणीमुळे ज्या अर्जांवर निर्णय घेणे शक्य नाही अशा अर्जांवर जिल्हास्तरीय बैठकीमध्ये विचार विनिमय करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तत्त्वांवर व विचारांवर काम सुरू आहे. त्यांचे विचार व तत्व कधीही सोडणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री . देसाई म्हणाले, लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे, त्यांच्या मतांमुळे आपणास आमदार, मंत्री होता आले. याची जाणिव ठेवून आपल्या मतदारसंघातील मतदारांबरोबर आपली पहिली बांधिलकी आहे हे कधीही विसरता कामा नये. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी सर्वसामान्य माणसाबरोबरची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांनी आपली तत्त्वे कणखरपणे जपली. आज आपणही त्याच तत्त्वाने काम केले पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पवार यांनी केले आभार विजय शिंदे यांनी मांडले. या कार्यक्रमाला विविध संस्था, पदाधिकारी, अधिकारी, शासकीय विभाग प्रमुख, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    जनता संतप्त – लाडकी बहीण बोगस ! मग सरकार पात्र कसं ?

    विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षणाचाही विलंब न करता लाडक्या बहिणींना निधी देऊन भरमसाट मते घेताना अविचार ; मात्र कोलमडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी पंचनामे करून (वेळ खाऊ प्रक्रियेनंतर) मदत करण्याची सरकारची वैचारिक…

    फलटण-दहिवडी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत श्रीमंत रामराजे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

    फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह साताऱ्याचे जिल्हाधिकारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    निवडणूकी अगोदर व निवडणुकी नंतरही “फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर व उपलब्ध”

    निवडणूकी अगोदर व निवडणुकी नंतरही “फलटणकर जनतेच्या सेवेसाठी प्रजा गट कायम तत्पर व उपलब्ध”
    error: Content is protected !!