जनता संतप्त – लाडकी बहीण बोगस ! मग सरकार पात्र कसं ?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षणाचाही विलंब न करता लाडक्या बहिणींना निधी देऊन भरमसाट मते घेताना अविचार ; मात्र कोलमडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी पंचनामे करून (वेळ खाऊ प्रक्रियेनंतर) मदत करण्याची सरकारची वैचारिक भुमिका परस्पर विरोधी.

लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचा धुरळा उडाला होता. 48 खासदार संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात महायुतीच्या केवळ 17 जागा निवडून आल्या होत्या. मतदारांचा कल ओळखत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाई गडबडीत महायुतीने महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना अमलात आणली. लाडक्या बहिणींनी भरघोस मतदान करत महायुतीला विधानसभा निवडणुकीत न भूतो, न भविष्य असा प्रचंड मोठा विजय मिळवून दिला.

मात्र आता याच लाडक्या बहिणींना सावत्र पणाची वागणूक महायुती सरकारकडून मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकी अगोदर कोणत्याही अटी शर्ती निकष यांचा अभ्यास न करता, लाडक्या बहिणी पात्र आहेत की नाहीत, याचा कसलाही विचार न करता सरकारकडून सरसकट तत्वावर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली होती.

ज्या बहिणींच्या जीवावर हे महायुतीचं सरकार निवडून आलं, त्याच बहिणींना बोगस म्हणण्याचं पाप, तसेच अपात्र बहिणी म्हणून संबोधत त्यांना योजनेतून डावलण्याचं पाप हे महायुती सरकार करत आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना बोगस म्हणत आहे, मग त्याच बोगस लाडक्या बहिणींची मतं घेतलेले सरकार पात्र कसं, असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जाऊ लागला आहे. लाडक्या बहीणीला बोगस म्हणणारे सरकारच बोगस आहे, अपात्र आहे. महायुती सरकारला खुर्चीवर बसून सत्ता उपभोगण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी लाडक्या बहिणींच्या व या जनतेच्या डोळ्यात धुळ फेकण्याचं काम केलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे देऊन खुर्चीवरून पाय उतार व्हावे अशी मागणी आता जनतेमधून जोर धरू लागली आहे.

मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे, पूरस्थितीमुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं असताना महायुती सरकार तिथे पंचनामे झाल्यानंतर केंद्राकडून बाधितांना मदत करण्याचं आश्वासन देत आहे. खरंतर या ठिकाणी आता सरसकट व तातडीने मदत देणे अपेक्षित असताना महायुती सरकार पंचनामे होण्याच्या वेळ खाऊ प्रक्रियेची वाट पाहत आहेत. विधानसभेच्या तोंडावर लोकांना आवश्यकता नसताना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक महिला भगिनींच्या खात्यात कोट्यवधी रक्कम जमा करत अमलात आणलेली लाडकी बहीण योजना व दुसरीकडे निवडणुका नसताना आत्ता सध्या महापुराने ग्रस्त असलेल्या लोकांचा आक्रोश पाहून देखील त्यांना तातडीने मदत न करणारे महायुती सरकार, असा एकूण विरोधाभास पाहून मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील जनता संतप्त झालेली आहे. फलटण तालुक्यातील जनता देखील दबक्या आवाजात सरकाच्या या परस्परविरोधी धोरणांचा निषेध करत आहे. एकंदरीत जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महायुती सरकार करत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे.

  • Related Posts

    पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांहस्ते शुभारंभ

    राज्यात प्रथमच या संकल्पनेची सुरुवात घरबसल्या लोकांना योजनांचा लाभ मिळणार सातारा दि. 26:नागरिकांना देय असणाऱ्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा…

    फलटण-दहिवडी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत श्रीमंत रामराजे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

    फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह साताऱ्याचे जिल्हाधिकारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार
    error: Content is protected !!