फलटण-दहिवडी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत श्रीमंत रामराजे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

या बैठकीला प्रशासनातील विविध खात्यांचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी कोळकी, झिरपवाडी, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, दुधेबावी या गावांमधील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामामुळे येणाऱ्या अडचणी आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे आणि विषय समजून घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांच्या समस्यांची तीव्रता लक्षात घेता, याप्रकरणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. तसेच, गरज भासल्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

  • Related Posts

    वीज महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर | गेला सहा निष्पाप गाईंचा बळी : प्रजा गट

    मृत अवस्थेत दिसत असलेल्या सहा गाई

    अमोल रासकर यांची बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदी वर्णी

    कार्यक्षम युवा नेतृत्व व झणझणे सासवड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अमोल रासकर यांच्या कार्य, कर्तृत्वाची व निष्ठेची गंभीर दखल घेत नेतृत्वाकडून फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष निमंत्रित स्वीकृत संचालक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!