भ्याड हल्ले व कट कारस्थाने थांबली नाहीत तर सर्वांची नावे समोर आणणार – धैर्यशील लोखंडे

धैर्यशील लोखंडे, उपाध्यक्ष सातारा जिल्हा,
आम आदमी पार्टी.

फलटण : धैर्यशील लोखंडे हे आपल्या चार वर्षांच्या मुलीसोबत फलटण विमानतळ परिसरातून जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी हातामध्ये लाकडी दांडके घेऊन आपचे उपाध्यक्ष धैर्यशील लोखंडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु घडत असलेल्या अतिरेकी हालचालींचा अंदाज येताच प्रसंगावधान राखून आपल्यावर हल्ला होणार असल्याची जाणीव होताच चपळाईने हल्लेखोरांना चकवा देत लोखंडे यांनी हल्लेखोरांपासुन सुरक्षित अंतरावर दूर गेल्यानंतर तात्काळ ११२ क्रमांक डायल करत पोलीसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अज्ञात संशयितांनी तेथून पळ काढला. या गंभीर प्रकरणात तीन अज्ञातांविरुद्ध फलटण पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली असल्याचे आपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील लोखंडे यांनी माहिती दिली.

परंतु पोलीसांनी त्या तीन अज्ञातांविरुद्ध एफ आय आर दाखल करून त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना योग्य ते कठोर शासन करावे अशी मागणी धैर्यशील लोखंडे यांचेसह फलटण तालुक्यातील आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. सदर घटना गंभीर असुन घडलेल्या घटनेचा सर्व तपशील आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कळवल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

  • Related Posts

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    error: Content is protected !!