वाठार निंबाळकर जि.प.गटाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक : विशाल माडकर

विशाल माडकर यांनी आपण उच्चशिक्षित असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची आपणास जाण असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच सुरवडी गावातील अनेक प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर सुरवडी ग्रामपंचायतकडुन विविध विकासकामे सुरू झाल्याने नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे विशाल माडकर यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विशाल माडकर यांनी पुढे सांगितले की सुरवडी आणि पंचक्रोशीसाठी गरजेचा असलेल्या रेल्वे पुलाशेजातील रस्ता श्री दत्त इंडिया लिमिटेड कारखान्याकडून करून घेण्यात आपण महत्वपूर्ण भुमिका निभावली आहे. यामुळे पंचक्रोशी मधील नागरिक या कामावर खुश होऊन समाधान असल्याची भावना व्यक्त करत आहेत. तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असल्यामुळे सुरवडी आणि पंचक्रोशी मधील नागरिक आणि तरुण वर्गाच्या मनात विशाल माडकर यांच्या विषयी सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

सुरवडी औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये सुरवडी गावातील तरुण वर्गाला प्राधान्याने कायम स्वरुपी रोजगार मिळावा यासाठी आपण सातत्याने कार्यरत आहोत, तसेच फलटण तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पीक पाणी योजनेवर देखील आवाज उठवण्याचे काम सातत्याने केल्याचे विशाल माडकर यांनी सांगितले.

आपल्यासारखा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेला अभ्यासू चेहरा वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून प्रतिनिधी म्हणून निवडून गेला तर येथील जनतेला न्याय मिळेल अशी खात्री विशाल माडकर यांनी व्यक्त केली आहे. मांडवकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी आम्ही त्यांना सहकार्य करून ताकदीने निवडून देऊ असे वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातील विविध गावातील नागरिक उघडपणे बोलून दाखवत असल्याचे देखील विशाल माडकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार
    error: Content is protected !!